Courses After 10th Class
|
⎆ दहावी नंतर काय ?
⎆ पोस्ट तारीख: 01-05-2024
⎆ बऱ्याच पालकांना किंवा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आता १० वी तर झाली आता पुढे काय ?: विद्यार्थ्यांना Science, Arts, Commerce यांच्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्यासाठी बरेच पर्याय आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात एक शंका असते 10 वी तर झाली आता कोणत्या क्षेत्रात करियर निवडावे. त्या साठी आम्ही थोडी नेट वरून माहिती गोळा करून तुमच्या फायद्याचा लेख तयार केला आहे.
विद्यार्थी व पालकांच्या मनातील एकच प्रश्न 10 वी तर झाली आता पुढे काय ? |
|
दहावी नंतर तुम्ही काय करू शकता व दहावी नंतरचे कोर्सेस | |
10 वी नंतर |
त्या नंतर पुढे काय ? |
12 वी |
- |
आर्टस् [Arts] |
BA, BBA, BCA, LLB, आर्मी [Army] भरती पत्रकारिता पदवी |
कॉमर्स [Commerce] |
Accountants, BCOM, BCA, BBA , आर्मी [Army] प्रवेश परीक्षा |
विज्ञान [Science] |
BSC (विज्ञान कृषी तांत्रिक ), BCA, BBA, इंजिनिअरिंग, वैद्यकीय पदवी, NDA प्रवेश परीक्षा आर्मी [Army], नौदल [Navy], हवाईदल [Airforce] व IIT & JEE आणि आर्टस् शाखेतील सर्व कोर्से. |
आयटीआय [ITI] |
नोकरी किंवा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग |
इंजिनिअरिंग डिप्लोमा |
नोकरी किंवा इंजिनिअरिंग पदवी |
कृषी डिप्लोमा [Diploma in Agriculture] |
कृषी पदवी किंवा नोकरी |
डिप्लोमा इन शिक्षक [D.ed] |
शिक्षक पदवी(B.ed) किंवा नोकरी |
मुक्त विद्यापीठ प्रवेश |
BA किंवा BCom |
डि फार्म [D Pharm] |
औषधी निर्माण पदव किंवा नोकरी |
ग्राफिक्स डिझाइन [Graphics Design] |
स्वत:चा ग्राफिक्स डिझाइनचा व्यवसाय |
अॅनिमेशन डिझाइन [Animation design] |
स्वत:चा अॅनिमेशन डिझाइनचा व्यवसाय |
वेब डिझाइन [Web design] |
स्वत:चा ऑनलाईन व्यवसाय |
10 वी नंतर शिक्षणाच्या मुख्य तीन श्रेणी आहेत | |
⎆ कला [Arts] ⎆ वाणिज्य [Commerce] ⎆ विज्ञान [Science] |
|
१० वी नंतर आर्टस् [Arts] | |
⎆ Arts हा विषय academic discipline आहे आणि Human condition च शिक्षण यात असत. analytics , critical आणि speculative असतात. राहणीमान, वैचारिक देवाणघेवाण, आपल्या जीवनामध्ये Social Understanding चे किती महत्व आहे. |
|
Arts मध्ये महत्वाचे एकूण किती व कोणकोणते विषय असतात | |
⎆ इतिहास [History] ⎆ भूगोल [Geography] ⎆ राज्यशास्त्र [Political Science] ⎆ इंग्रजी [English] ⎆ अर्थशास्त्र [Economics] ⎆ मानसशास्त्र [Psychology] ⎆ ललित कला [Fine Arts] ⎆ समाजशास्त्र [Sociology] ⎆ शारीरिक शिक्षण [Physical Education] ⎆ साहित्य [Literature] ⎆ या पैकी ठराविक विषयांची निवड करावी लागते. |
|
१० वी नंतर Arts घेण्याचे फायदे: | |
⎆ या विषयाची निवड बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून करतात.यामध्ये तुम्हाला जास्त कठीण विषयाचा अभ्यास करावा लागत नाही. | |
१० वी नंतर वाणिज्य [Commerce ] | |
⎆ बरेच विद्यार्थी ज्यांना business मध्ये आवड असते आणि पुढे स्वतःचा business सुरु करायचा आहे असे विद्यार्थी या विषयाची निवड करतात.यात विद्यार्थ्यांना trade आणि business विषय शिकवले जाते. या क्षेत्रात Finance, Planning, Accountancy, Tax Practitioners, Broking, Banking शिकवले जाते. | |
Commerce मध्ये महत्वाचे एकूण किती व कोणकोणते विषय असतात. | |
⎆ अर्थशास्त्र [Economics] ⎆ अकाऊंटंन्सी [Accountancy] ⎆ बिझनेस स्टडीज / ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स [Business Studies / Organisation of Commerce] ⎆ इंग्रजी [English] ⎆ गणित [Mathematics] ⎆ माहिती पद्धती [Information practices] ⎆ आकडेवारी [Statistics] |
|
१० वी नंतर Commerce घेण्याचे फायदे | |
⎆ Science पेक्षा प्रसिद्ध Commerce आहे. ते जास्त focus असतात स्वतःच्या करिअर साठी | |
१० वी नंतर विज्ञान [Science] | |
⎆ खूप विद्यार्थी Science मिळवण्यासाठी इच्छुक असतात.१० वी नंतर विज्ञान हा जास्त आकर्षक विषय आहे.Engineering, Medical,Computer Science,IT असे बरेच करिअर ऑप्शन विज्ञान मध्ये आहेत. Science च्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना पद्धतशीर व भरपूर अभ्यास करावा लागते.१० वी नंतर science मध्ये Physics, Chemistry, Biology या तीन विषयामध्ये करिअर करू शकता. | |
Science मध्ये महत्वाचे एकूण किती व कोणकोणते विषय असतात | |
⎆ भौतिकशास्त्र [Physics] ⎆ गणित [Mathematics] ⎆ जीवशास्त्र [Biology] ⎆ इंग्रजी [English] ⎆ रसायनशास्त्र [Chemistry] ⎆ संगणक विज्ञान/आयटी (माहिती तंत्रज्ञान) [Computer Science / IT(Information Technology)] ⎆ जैवतंत्रज्ञान [Biotechnology] |
|
१० वी नंतर Science घेण्याचे फायदे | |
⎆ जास्तीत जास्त विद्यार्थी हे कोर्से निवडतात. Engineering आणि Medical Science. करिअर निवडण्याचे सध्याला २ मुख्य Course आहेत. | |
१० वी नंतर पॉलिटेक्निक अभ्यासक्रम | |
⎆ Polytechnic Courses काय आहे ? ⎆ पॉलिटेक्निक कोर्स हा एक प्रकारचा तांत्रिक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याला व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाते. कौशल्य विकसित केले जाते. हा ३ वर्षाचा रेगुलर कोर्स आहे. संपूर्ण फोकस प्रॅक्टिकल ज्ञान वर दिले जाते. |
|
10 वी नंतर आयटीआय [ITI] | |
⎆ ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच शिक्षण पूर्ण करून नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल त्यांच्या साठी ITI हा चांगला पर्याय आहे. | |
आयटीआय [ITI] म्हणजे काय ? | |
⎆ या कोर्समध्ये औद्योगिक प्रशिक्षण आणि कौशल्य वर जास्त दिला जाते. यात भरपूर अभ्यासक्रम दिला आहे. त्यांना ट्रेड असेही म्हणतात. आयटीआय हा कोर्स 8 वी पासून ते 12 वी पर्यंतचे कोणत्याही शाखेचे विद्यार्थी करू शकता. | |
आयटीआय [ITI] संस्था काय आहे ? | |
⎆ आयटीआय [ITI] संस्था त्यांना म्हणतात ज्या ठिकाणी आयटीआय [ITI] चे शिक्षण दिले जाते. यात पूर्णपणे पायाभूत सुविधा आणि साधने असतात. त्यांचा विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंगसाठी वापर केला जातो. | |
आयटीआय [ITI] चे मुख्य प्रकार | |
⎆ आयटीआय [ITI] चे मुख्य २ प्रकार असतात. ⎆ सरकारी आयटीआय [Goverment ITI] ⎆ खाजगी आयटीआय [Private ITI] |
|
10 वी नंतर डिप्लोमा [Diploma] | |
⎆ कमी खर्चामध्ये तुम्ही तांत्रिक शिक्षण घेऊ शकता. डिप्लोमाचे शिक्षण घेतल्याने तुम्हाला लवकर नोकरी लागण्याचे चान्सेस असतात. | |
१० वी नंतर करिअर निवडताना होणाऱ्या चुकांपासून वाचण्यासाठी या महत्वपूर्ण टिप्स नक्की वाचा. | |
⎆ 10 वी म्हणजे निर्णायक टप्पा. दहावी चे वर्ष म्हणजे विद्यार्थी आणि पालकांसाठी परीक्षा असल्यासारखेच.यावेळी मिळालेली मार्क्स तुमच्या वाटचालीची दिशा ठरवतात. 10 वी नंतर निर्णय घेणे खूपच कठीण असते. आपल्याला कोणत्या शाखेत जायचे हेय ठरवावे लागते. कितीही जास्त किंवा कमी ऊन असले तरी कुठे तरी विज्ञान शाखेला प्रवेश मिळतो का यासाठी प्रयत्न केले जातात. खूप प्रयत्न करूनही जर इथे प्रवेश मिळाला तर तर मग कॉमर्स चा विचार केला जातो. खूप प्रयत्न करून इथं हि काही फायदा झाला नाही तर मग शेवटी कला शाखेचा पर्याय स्वीकारावा लागेल.एकदा या पायरीवर चुकीची निवड झाली की करियर मधील महत्वाचे वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. बहुतेक पालकांची इच्छा असते की आपल्या पाल्याने विज्ञान शाखा निवडावी त्या नंतर डॉक्टर, इंजिनिअर असे प्रतिष्ठित मार्ग निवडावे. 10 वी नंतर विज्ञान शाखेतून करियर करायला नको असे वाटत असेल तर काही फरक पडत नाही.10 वी नंतर तुम्हाला वाणिज्य आणि कला शाखा निवडण्याचा पर्याय खुला आहे याउलट वाणिज्य आणि कला शाखेत मुभा नसते. बरेचदा पालकांचा आग्रह असतो कि विज्ञानच शाखा निवडावी. विद्यार्थी सुद्धा सुरक्षित बाजू म्हणून याचाच विचार करतात. हि शाखा जरा कठीण मानली जाते. आवड नसतानाही ती निवडून जर तुम्हाला तो अभ्यासक्रम जमलं नसेल तर वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. शिवाय बारावी नंतर पुन्हा वेगळी शाखा घ्यायची म्हणजे अभ्यासक्रमात होणार बदल आपल्याला स्वीकारता येणार आहे का याचाही विचार व्हायला हवा. हा सगळं गोंधळ वाढवण्यापेक्षा आपल्याला ज्यात रस आहे ते निवडणे कधीही उत्तमच आहे. | |
कला [Arts] | |
⎆ काहीच पर्याय नाही म्हणून नाइलाज समजल्या या शाखेतील सर्व पर्यायांची फारशी माहितीच घेतली जात नाही. खरतर कला शाखेतून सुद्धा खूप मार्ग निवडता येतात. समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशस्त्र, इतिहास आणि अश्या अनेक विषयात याद्वारे आपल्याला पदवी घेता येते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हा तर एक उत्तम पर्याय आहे. शिवाय शाखेनंतर पुढे अॅनिमेशन, अभिनय किंवा इतर कुठल्याही क्रियेटीव्ह क्षेत्रात पदवी घेऊन असंख्य मार्ग उपलब्ध होतात. | |
वाणिज्य [Commerce] | |
⎆ वाणिज्य शाखेत आर्थिक व्यवहारांशी निगडित संपूर्ण अभ्यासक्रम असतो. यात काटेकोरपणा आणि अचूकता ला खूप महत्व आहे. म्हणून विज्ञान नाही मिळाले तर वाणिज्य [Commerce] निवडू असा विचार करणे चुकीचे आहे. या शाखेसाठी लागणारी कौशल्य विद्यार्थात आहे का आणि यानंतर ज्या प्रकारची नोकरी असेल ती करणे त्याला जमणार आहे का याचाही विचार करायला हवा. | |
डिप्लोमा [Diploma] | |
⎆ 11 वीचे शिक्षण न घेता तुम्ही डिप्लोमा या केर्सचा पर्याय निवडू शकता. डिप्लोमा नंतर तुम्ही ज्या विषयात डिप्लोमा केला आहे त्या डिप्लोमा पदवीलाही प्रवेश घेऊ शकता. पण डिप्लोमा करण्यासाठी तुम्हाला नक्की कशात करिअर करायचे आहे हेय नक्की माहित असायला हवे. कारण एकदा की हा मार्ग निवडला तुम्हाला दुसरा पर्याय नसेल. त्याच विषयात पुढील शिक्षण घेणे बंधनकारक असेल. याच फायदा असा असेल कि तुमची दिशा नक्की असेल तर इतर विषयांचा अभ्यास न करता तुम्हाला फक्त तुमच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. | |
आवड आणि इच्छा | |
⎆ आयुष्यात तुम्ही जी दिशा निवडतात त्यात तुम्हाला पुढील संपूर्ण आयुष्यभर काम करावे लागते. त्यामुळे त्यातून किती पैसे कमवता येतील हा विचार न करता आपण हे काम एवढ्या मोठ्या कालावधीसाठी करू शकतो का ? हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. आपल्याला आवडणाऱ्या विषयात जर आपण काम करण्याचा विचार जर केला तर आपल्याला सहसा कंटाळा येत नाही. म्हणून आवडीच्या विषयातच करिअर करण्याचा निर्णय घेणे कधीही फायद्याचे आहे. शिवाय आवड असल्यामुळे त्यात प्रगती करणेही अवघड वाटत नाही. | |
अनुभवी लोकांशी चर्चा | |
⎆ ज्या विषयात आपल्याला आवड आहे त्यात पूर्वी करिअर केलेल्या लोकांशी चर्चा करणे खूप फायद्याचे आहे. तुम्हाला भविष्यात यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायला हवे याची कल्पना येते. पालक, शिक्षक, मोठे बहीण भाऊ, चांगले मित्र यांनाही तुम्ही तुमच्या शंका विचारू शकतात. आतून तुम्हाला चांगली उत्तरे आणि नवनवीन माहितीत मिळेल. या लोकांना तुमच्या बद्दल अशा गोष्टी माहिती असतात ज्याची तुम्हालाही कल्पना ही नसते. त्यामुळे ते अशा गोष्टींची जाणीव देऊन विविध पर्याय सुचवू शकतात. | |
निर्णय क्षमता | |
⎆ तुमच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. कोण काय कोणता मार्ग निवडतोय याचाही विचार करू नका. स्वतःच्या भविष्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी स्वतः घ्या. त्यासाठी हवे तेवढे प्रयत्न करा. शेवटी तुम्हाला काय करायचे हा निर्णय स्वतःच्या हातात ठेवा. | |
!! ब्लॉग कसा वाटला कमेंट्स नक्की करा !! |
0 Comments:
Don't spam comments