What next after 12th Class

⎆ बारावी नंतर पुढे काय ?

⎆ पोस्ट तारीख: 01-05-2024

⎆ बऱ्याच पालकांना किंवा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आता 12 वी तर झाली आता पुढे काय ?: आपल्या सर्वांना माहित आहे की, इयत्ता 10 वी पर्यंत आपल्या सर्वांना समान विषय शिकवले जातात आणि 10 वी उत्तीर्ण झाल्या नंतरच आपल्याला आपले आवडीचे विषय निवडण्याची संधी मिळते आणि आपण ज्या विषयात आपल्याला रस वाटतो तो विषय आपण निवडतो. परंतु, 12 वी नंतर काय करावे हे ठरवणे बर्‍याच विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना खूप कठीण जाते कारण प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे जाऊन आपल्या क्षेत्रात प्रभुत्व मिळवायचे असते करिअर करायचे असते, जेणेकरून त्याला स्वतःची वेगळी व चांगली ओळख निर्माण करता येईल.

जेव्हा आपण बारावीची परीक्षा उत्तीर्ण होतो, तेव्हाच आपले भविष्य वळणावर येते, कारण बारावीनंतरच आपल्याला पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेता येतो. म्हणजेच बारावीनंतरच आपण पदवीसाठी ( Digree ) अर्ज करू शकतो. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर  विद्यार्थ्याना त्यांच्या करिअरला योग्य दिशा द्यायची असते, परंतु त्यांना 12 वी नंतर काय करावे हेच माहित नसते.

त्यामुळे अशा परिस्थितीत ते त्यांच्या पालकांचा, मोठ्या भावंडांचा किंवा ज्यांना या विषयांचे चांगले ज्ञान आहे अशा कोणत्याही नातेवाईकाचा सल्ला ते घेऊ शकतात किंवा बारावी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत मिळालेल्या गुनानुसार कोणता विषय निवडावा हे या लेखाद्वारे तुम्हाला कळू शकेल. चला तर मग सुरुवात करूया आणि एक एक करून सर्व विषयांची माहिती घेऊया, की १२ वी नंतर कोणता कोर्स करावा हे जाणून घेण्यासाठी आमची ही पोस्ट  शेवटपर्यंत नक्की वाचा.

विद्यार्थी व पालकांच्या मनातील एकच प्रश्न 

12 वी तर झाली आता पुढे काय ?

WWW.YOSUSAI.IN

Join Whatsapp

महत्बावाचे कोर्सेस

12 वी आर्टस् [Arts] असेल तर

BA, BBA, BCA, LLB, आर्मी [Army] भरती पत्रकारिता पदवी

12 वी कॉमर्स [Commerce] असेल तर

Accountants, BCOM, BCA, BBA , आर्मी [Army] प्रवेश परीक्षा

12 वी विज्ञान [Science] असेल तर

BSC (विज्ञान कृषी तांत्रिक ), BCA, BBA, इंजिनिअरिंग, वैद्यकीय पदवी, NDA प्रवेश परीक्षा आर्मी [Army], नौदल [Navy], हवाईदल [Airforce] व IIT & JEE आणि आर्टस् शाखेतील सर्व कोर्से.

आयटीआय [ITI] असेल तर

नोकरी किंवा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग

इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर

नोकरी किंवा इंजिनिअरिंग पदवी

कृषी डिप्लोमा [Diploma in Agriculture] असेल तर

कृषी पदवी किंवा नोकरी

डिप्लोमा इन शिक्षक [D.ed] असेल तर

शिक्षक पदवी(B.ed) किंवा नोकरी

मुक्त विद्यापीठ प्रवेश असेल तर

BA किंवा BCom

डि फार्म [D Pharm] असेल तर

औषधी निर्माण पदव किंवा नोकरी

ग्राफिक्स डिझाइन [Graphics Design] असेल तर

स्वत:चा ग्राफिक्स डिझाइनचा व्यवसाय

अॅनिमेशन डिझाइन [Animation design] असेल तर

स्वत:चा अॅनिमेशन डिझाइनचा व्यवसाय

वेब डिझाइन [Web design] असेल तर

स्वत:चा ऑनलाईन व्यवसाय
12 वी नंतर पुढे काय करावे

⎆ 12 वी सायन्स (PCM) नंतर विद्यार्थी B.Tech, B.Sc इत्यादी course करू शकतात आणि PCB चे विद्यार्थी MBBS, BDS इत्यादी course करू शकतात. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी बी.कॉम., सीए, इ. Course करणे योग्य राहील, तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बीए, बीजेएमएस इ. Course करावेत.

⎆ पुढे तुम्हाला 12 वी नंतरचे अनेक अभ्यासक्रम सांगितले जातील, त्यापैकी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही कोर्स निवडू शकता. कोणताही कोर्स निवडण्यापूर्वी त्याबद्दलची माहिती घ्या जसे की, कोर्सची फी किती आहे, त्यानंतर करिअरचे पर्याय कोणते आहेत. ते, कोणती महाविद्यालये याचा अभ्यासक्रम देतात, इ.

12 वी आर्टस् [Arts] नंतर 

⎆ कला (Arts) शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. चला तर मग जाणून घेऊया त्या करिअर पर्यायांबद्दल जे तुम्ही 12 वी पास केल्यानंतर करू शकता.

बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स

⎆ जर तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुमचे करिअर घडवायचे असेल तर बारावीनंतर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता.

बारावीनंतर इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स
⎆ आजच्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट हा एक उत्तम करिअर पर्याय म्हणून उदयास आला आहे. जर तुम्ही कोणताही कार्यक्रम व्यवस्थित व्यवस्थापित (मॅनेज) करू शकत असाल तर तुम्ही तुमच्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स करू शकता. यानंतर तुम्ही लग्न, पार्टी अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे इव्हेंट मॅनेजर बनून चांगली कमाई करू शकता. आजच्या काळात हा एक चांगला करिअर पर्याय आहे.
बारावीनंतर लॉ (LLB)
⎆ जर तुम्हाला वकिली करायची असेल आणि तुम्हाला चांगला युक्तिवाद करता येत असेल तर तुम्ही तुमचा करिअर पर्याय म्हणून वकिली निवडू शकता. यासाठी तुम्ही बारावीनंतर LLB आणि LLM करू शकता.
12वी नंतर बॅचलर ऑफ आर्ट्स (BA)

⎆ बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला ज्या विषयात रस असेल, त्यामध्ये बी.ए. करू शकता बीए केल्यानंतर एमए करता येते. ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकता. याशिवाय बीए केल्यानंतर अध्यापन क्षेत्रात जायचे असेल तर बीएड करा. याच्या मदतीने तुम्ही अध्यापनाच्या नोकरीसाठीही अर्ज करू शकता.

12 वी नंतर विज्ञान [Science]

⎆ बारावी सायन्सनंतर विद्यार्थ्यांना अनेक चांगले कोर्सेस करण्याचे मार्ग आहेत. जसे की MBBS, BDS, B.Sc, B.Tech, B.Arch व इ.

⎆ 12 वी विज्ञानचा अभ्यास दोन भागात विभागलेला असतो.

  • PCM: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित
  • PCB: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र

किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र हे चारही विषय एकत्र असू शकतात.

12 वी PCM नंतर काय करावे ?

⎆ 12वी PCM चे बहुतेक विद्यार्थी Engineering कडे जातात. ज्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक व्हायचे आहे किंवा संशोधन क्षेत्रात जायचे आहे, त्यांनी B.Sc. या शिवाय PCM चे विद्यार्थी commerce आणि Arts शाखेतील जवळपास सर्व अभ्यासक्रमही करू शकतात.

12 वी PCM नंतरचे प्रमुख अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे

⎆ बॅचलर इन टेक्नॉलॉजी (B.Tech)

⎆ NDA

⎆ बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc)

⎆ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (B.Arch)

⎆ बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (BCA)

⎆ मर्चंट नेव्ही (B.Sc. नॉटिकल सायन्स)

⎆ पायलट (भारतीय फ्लाइंग स्कूल 2-3 वर्षांचा CPL कार्यक्रम आयोजित)

⎆ रेल्वे शिकाऊ परीक्षा (निवड झाल्यानंतर ४ वर्षांचे प्रशिक्षण)

⎆ जर तुमचाही 12 वी (PCM) नंतर इंजिनीअरिंग करायचा विचार असेल तर तुम्ही आतापासून JEE मेनची तयारी सुरू करावी, कारण सर्व टॉप इंजिनीअरिंग कॉलेजेसमध्ये बीटेकमध्ये फक्त JEE Main स्कोअरच्या आधारे प्रवेश मिळतो.

⎆ जर तुम्हाला IIT मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला JEE Main तसेच JEE Advanced पास करावे लागेल.

बारावीनंतर PCB नंतर काय करावे ?

⎆ बहुतेक तेच विद्यार्थी 12 वी PCB करतात, ज्यांना  डॉक्टर किंवा फार्मासिस्ट बनायचे असते. डॉक्टर होण्यासाठी तुम्ही MBBS, BDS इ. कोर्सेस करू शकता.

⎆ याशिवाय तुम्ही बॅचलर ऑफ फिजिओथेरपी ( bachelor of physiotherapy ) करू शकता. हे एक ट्रेंडिंग करिअर पैकी एक आहे आणि या करियर मध्ये जास्त स्पर्धा हि होत नाही.

⎆ 12 वी PCB नंतर अनेक नामांकित करिअर उपलब्ध आहेत. यानंतर तुम्हाला हॉस्पिटल, सायन्स लॅब, रिसर्च इन्स्टिट्यूट इत्यादींमध्ये नोकऱ्या मिळवू शकतात. किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे मेडिकल किंवा दवाखाना उघडू शकता.

12 वी PCM नंतरचे प्रमुख अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे

⎆ Bachelor of Science बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc)

⎆ B.Sc in Agriculture कृषी विषयात बीएससी

⎆ B. Pharma बी. फार्मा

⎆ Biotechnology जैवतंत्रज्ञान

⎆ Bioinformatics बायोइन्फॉरमॅटिक्स

⎆ Microbiology सूक्ष्मजीवशास्त्र

⎆ Nursing नर्सिंग

⎆ Genetic अनुवांशिक

⎆ Forensic science फॉरेन्सिक विज्ञान

⎆ Environmental science पर्यावरण विज्ञान

⎆ Bachelor of Medicine and Bachelor of Surgery बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS)

⎆ Bachelor of Dental Surgery बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS)

⎆ Bachelor of Homeopathic Medicine and Surgery बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी (BHMS)

⎆ Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery बॅचलर ऑफ आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया (BAMS)

⎆ Bachelor of Unani Medicine and Surgery बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी (BUMS)

⎆ Bachelor of Physiotherapy बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (BPT)

⎆ Degree in Veterinary Science and Animal Husbandry पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी (B.V.Sc. & AH)

⎆ तुम्हाला जर वर दिलेल्या अभ्यासक्रमांमधून MBBS, BDS, BHMS किंवा BUMS करायचे असल्यास, या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला नीट परीक्षा पास करावी लागेल. त्यानंतर NEET स्कोअरच्या आधारे यात प्रवेश दिला जाईल.

⎆ तुम्हाला जर 12 वी PCB नंतर लवकरच नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही Paramedical कोर्स करू शकता. हे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहेत. त्याची फी आणि कालावधी दोन्ही प्रामुख्याने कमी आहेत.

12 वी PCB नंतरचे प्रमुख Paramedical अभ्यासक्रम खालीलप्रमाणे

⎆ BSc in X-ray technology

⎆ BSc in Medical Imaging Technology

⎆ Bachelor of Occupational Therapy

⎆ B.Sc. OTT (Operation Thatcher Technology)

⎆ BSc in Dialysis Technology

⎆ BSc in MLT (Medical Lab Technology)

⎆ B.Sc in Radiography

⎆ BSc in Medical Record Technology

⎆ BSc in Audiology and Speech-Language Pathology (BSALP)

⎆ BSc in Ophthalmic Technology

⎆ BSc in Audiology and Speech Therapy

⎆ B.Sc in Optometry

⎆ BSc in Anesthesia Technology

⎆ हे कोर्स तुम्ही बारावी PCB नंतर करू शकतात. व करियर घडवू शकतात.

12 वी नंतर कॉमर्स [Commerce]
⎆ कॉमर्सचे विद्यार्थी बारावीनंतर फायनान्स, बँकिंग आणि अकाउंट्स या क्षेत्रात करिअर करू शकतात. त्यांच्यासाठी कोणते चांगले पर्याय आहेत ते पुढील प्रमाणे.
बारावी कॉमर्स नंतर चार्टर्ड अकाउंटंट (CA) कोर्स
⎆ चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) हा आजचा सर्वात प्रतिष्ठित अभ्यासक्रम आहे. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी (CA) Course करू शकतात. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि गेल्या काही वर्षांत GST सारख्या कर सुधारणांमुळे CA ची मागणी आर्थिक क्षेत्रात झपाट्याने वाढली आहे. हा Course इतर कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमापेक्षा स्वस्त आहे म्हणजे याची फी कमी आहे. आणि जर तुम्ही परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि मार्गदर्शनासाठी चांगल्या संस्थेतून कोचिंग घेतले तर तुम्ही 4 वर्षात कोर्स पास करू शकता. आणि 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर 4 वर्षांनी तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीत CA म्हणून नोकरी करू शकता किंवा तुमचे काम स्वतंत्रपणे करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुमचे उत्पन्न वाढण्याबरोबरच समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढते.
12 वी कॉमर्स नंतर कंपनी सेक्रेटरी (CS) कोर्स
⎆ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कंपनी सेक्रेटरी हा एक चांगला पर्याय आहे. कंपनी सेक्रेटरी कंपनीशी संबंधित सर्व आर्थिक आणि कायदेशीर बाबी चांगल्या प्रकारे समजून घेतात, त्यामुळे तो कंपनी इतर कोणापेक्षाही चांगल्या प्रकारे चालवू शकतो.
बारावी कॉमर्स नंतर BBA
⎆ बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA) हा अभ्यासक्रमही बारावीनंतर करिअरचा एक चांगला पर्याय आहे. पण BBA करण्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही त्याची मास्टर डिग्री MBA करता. तुम्ही चांगल्या कॉलेजमधून BBA आणि MBA केल्यास तुमच्यासमोर करिअरचे अनेक पर्याय खुले होतात. MBA प्रोफेशनलचे काम कोणत्याही कंपनीचे व्यवस्थापन हाताळणे असते. कोणत्याही कंपनीच्या CEO सारख्या उच्च पदांवर MBA व्यावसायिक आहे. पण MBA कोर्स हा महागडा कोर्स आहे.
बारावी कॉमर्स नंतर बी.कॉम B.Com
⎆ वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही B.Com करू शकता. B.Com केल्याने अकाउंट्स आणि बिझनेस मॅनेजमेंट या विषयांबद्दलचे तुमचे ज्ञान वाढते. आणि या ३ वर्षाच्या कोर्समध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. परंतु या पदवीसह, तुमची कौशल्ये वाढविण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे.
बारावी कॉमर्स नंतर BMS

⎆ बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS) हा ३ वर्षांचा कोर्स आहे. आणि कॉमर्सचे विद्यार्थी हा कोर्स केल्यानंतर अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. नोकरीसाठी हा खूप चांगला कोर्स आहे आणि त्यानंतर अनेक चांगल्या कंपन्या तुम्हाला नोकरीसाठी ऑफर देतात तुम्हीही कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासमोरही करिअरचे अनेक पर्याय आहेत.

⎆ हा देखील एक अतिशय लोकप्रिय प्रवाह आहे जो विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतर निवडतात. यामध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक आणि व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करावा लागतो. त्याच वेळी, ते त्या विद्यार्थ्यांसाठी अधिक योग्य आहेत ज्यांच्याकडे विश्लेषणात्मक कौशल्ये आहेत.

⎆ अर्थशास्त्र, लेखा आणि व्यवसाय अभ्यास हे त्यांचे मुख्य विषय आहेत. यासोबतच तुम्हाला गणित हा अतिरिक्त विषय म्हणून घ्यावा लागेल.

पुढे काही कोर्सची नावे आहेत जे तुम्ही 12 वी नंतर करू शकता

⎆ C.A (चार्टर्ड अकाउंटन्सी फाउंडेशन)

⎆ B.B.A (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन)

⎆ B.M.S (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स)

⎆ B.B.S (बॅचलर ऑफ बिझनेस स्टडी)

⎆ Integrated Law Course (इंटिग्रेटेड लॉ कोर्स)

⎆ B.F.A (बॅचलर ऑफ फायनान्स अकाउंटन्सी)

⎆ B.H.M (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट)

⎆ B.C.A (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन)

⎆ B.Sc (इन स्टॅटिक्स)

⎆ B.E.M (बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट)

⎆ B.M.M (बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास मीडिया)

⎆ B.Sc (इनमेशन आणि मल्टीमीडिया)

⎆ B.F.D (बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन)

⎆ B.E.Ed (Bachelor of Elementary Education)

⎆ B.P.Ed (शारीरिक शिक्षण पदवी) व्यावसायिक संगणक अभ्यासक्रम

क्रेडीट बाय naadmarathi.in
!! ब्लॉग कसा वाटला कमेंट्स नक्की करा !!
.

0 Comments:

Don't spam comments